च्याआयला आपली लायकीच नव्हती ....
कॉलेजच्या नवीन दिवसात
ती माझ्याकडे आली...
मी मनात म्हटले.."बरे झाले
तेवढी ओळख तरी झाली...
तिने विचारले.."Eco च्या Notes देशील??"...
च्याआयला आपली लायकीच नव्हती ....
Notes ची देवाण-घेवाण करून
आम्ही पुरते थकलो...
अभ्यासाताल्या difficulties
सोडवून सोडवून पकलो...
प्रेमाच्या गोष्टी केल्याच नाहीत कुणी...
च्याआयला आपली लायकीच नव्हती ....
अश्रु गाळायला मैत्रिणीनी
वापरला आमचा खांदा...
Best Friend च्या गोंडस नावाने
केला आमचा Full-Too वांदा...
Boyfriend च्या जागेवर Promotion कधी झालेच नाही...
च्याआयला आपली लायकीच नव्हती ....
दरवर्षी Rose-Day ला फक्त
पिवळ्या गुलाबा-पर्यंत मजल...
नंतर घरी येउन ऐकायची
एखादी दुख-भरी गझल...
प्रेमाचे गाणे म्हटलेच नाही कुणी...
च्याआयला आपली लायकीच नव्हती ....
Valentine Day ला कुणाला
propose करायचा झाला नाही धीर...
आमच्या Cupidच्या धनुष्यातून
कधी सुटलाच नाही प्रेमतीर...
साला Stupid Cupid पण काय करणार...
च्याआयला आपली लायकीच नव्हती ....
आपल्या हिन्दी सिनेमातल्या
Hero-Heroine चे बरे असते...
अगदी 'पहली नजर में'
एकमेकावर प्रेम बसते...
आम्ही अजुन waiting list वरच आहोत...
च्याआयला आपली लायकीच नव्हती ....
मैत्री फक्त कामापुरती राहील
याची मैत्रिणीनी घेतली दक्षता...
नंतर direct लग्नाचे आमंत्रण
टाकायला गेलो आम्ही अक्षता...
नवरयाच्या पगाराचे आकडे ऐकले...
च्याआयला आपली लायकीच नव्हती ....
साधे लग्न-सुद्धा जमवताना
झाली आमची कुचम्बणा...
प्रत्येक मुलीचा बाप करी
पगार-Flat बद्दल विचारणा...
पैशापुढे ठरलो आम्ही दुय्यम
कारण फक्त एकच...
च्याआयला आपली लायकीच नव्हती ....
Jab Main Chhota Bachcha Thaa…
१४ वर्षांपूर्वी
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा