रविवार, ७ जून, २००९ |
1 comments
ही एका हतबल आणि निराश पतीची आत्मकथा आहे...जी त्याने वटपौर्णिमेच्या दिवशी लिहीली...
अग ऐ बायको...कशाला करतेस तू
उगीच वटपौर्णिमा साजरी...
अवजड दागिने दिमाखात मिरवत
अन् लेवुनी वस्त्रे भरजरी...
तुला माहितेय का?
सत्ययुगात होती एक सावित्री
जिने फेकले माहेरचे सर्व दागिने...
सत्यवान होता गरीब अन् अल्पायुषी
तरीही त्याला 'पती' म्हणुनी वरला तिने...
आणि तू ???
रोज माझ्या डोक्याला ताप देतेस
महागड्या वस्तुंच्या खरेदीसाठी...
पुरवले नाही जर हट्ट तुझे
लाटणे घेवुनी लागतेस पाठी...
सत्यवान मेला वडाच्या झाडाखाली
पण कमाल केली प्रेमरूपी सुताने...
खेचुनी आणिले मरणाच्या दारातून
अन् यमराज परतला रिकाम्या हाताने...
आणि आपण ???
लग्नाआधी आपण गाणे म्हणत
पळत होतो मिळेल त्या झाडाभोवती...
सूत जमले आपले..अन् लग्न केले तुझ्याशी
संसाराच्या दोरखन्डाने बांधलो गेलो शेवटी...
तू घरात पाउल टाकताच क्षणी
वाटे मला...आला यमराज दारापाशी...
वडाला दोरा बांधायच्या ऐवजी
त्याच दोरयाने लटकावून दे मला फाशी...
सात जन्माची मागणी नको करूस
हाच जन्म मला नकोसा झालाय...
एका जन्मठेपेची शिक्षा बस झाली
रोज रोज मरण्याचा कंटाळा आलाय...
अग ऐ बायको...नको ना करू वटपौर्णिमेची पूजा...
जीवनाचे दान मागतोय एकुलता एक नवरा तुझा...
अग ऐ बायको...कशाला करतेस तू
उगीच वटपौर्णिमा साजरी...
अवजड दागिने दिमाखात मिरवत
अन् लेवुनी वस्त्रे भरजरी...
तुला माहितेय का?
सत्ययुगात होती एक सावित्री
जिने फेकले माहेरचे सर्व दागिने...
सत्यवान होता गरीब अन् अल्पायुषी
तरीही त्याला 'पती' म्हणुनी वरला तिने...
आणि तू ???
रोज माझ्या डोक्याला ताप देतेस
महागड्या वस्तुंच्या खरेदीसाठी...
पुरवले नाही जर हट्ट तुझे
लाटणे घेवुनी लागतेस पाठी...
सत्यवान मेला वडाच्या झाडाखाली
पण कमाल केली प्रेमरूपी सुताने...
खेचुनी आणिले मरणाच्या दारातून
अन् यमराज परतला रिकाम्या हाताने...
आणि आपण ???
लग्नाआधी आपण गाणे म्हणत
पळत होतो मिळेल त्या झाडाभोवती...
सूत जमले आपले..अन् लग्न केले तुझ्याशी
संसाराच्या दोरखन्डाने बांधलो गेलो शेवटी...
तू घरात पाउल टाकताच क्षणी
वाटे मला...आला यमराज दारापाशी...
वडाला दोरा बांधायच्या ऐवजी
त्याच दोरयाने लटकावून दे मला फाशी...
सात जन्माची मागणी नको करूस
हाच जन्म मला नकोसा झालाय...
एका जन्मठेपेची शिक्षा बस झाली
रोज रोज मरण्याचा कंटाळा आलाय...
अग ऐ बायको...नको ना करू वटपौर्णिमेची पूजा...
जीवनाचे दान मागतोय एकुलता एक नवरा तुझा...
1 comments:
bichaara traaslela navhra! :P
do you think dat poor husband represents all of his kind in this world? I hope NOT! ;)
i guess, he wasn't in his right mind when 'the poet (you)' entered his mind to garner his thoughts! but all in all... this poem's got plenty of laughs!! :D
टिप्पणी पोस्ट करा