उन्हाळ्यात घामाची बरसात झाल्यानंतर शेवटी एकदाचा पाउस सुरु होतो... बेडूक डबक्यातून बाहेर येउन डराव डराव करायला लागतात... मोर पिसारा फुलवून नाचू लागतो... चातक पक्षी आपले आ वासलेले तोंड एकदाचे बंद करतो... तसा पावसाळ्यात आनंदित होणारा अजुन एक प्राणी म्हणजे कवी... जागोजागी कुत्र्याची छत्री उगवतात त्याप्रमाणे वाटेल तो माणूस कवी बनतो आणि कवितांचा महापुर येतो... तोंडावर पाणी मारून उठ्वल्यासारखे ही कवी मंडळी पाउस पडताच निद्रितावस्थेतुन जागी होतात... एखादी बाई माहेरी आल्यावर शेजारच्या घरात गावगप्पा मारायला फिरत असते.... अगदी तसेच हे कवी लोक जो भेटेल त्याला पावसाळी कविता ऐकवत फिरतात... त्यातलाच मी एक नवशिक्या हौशी कवी कागद-पेन घेउन कविता खरडायला बसतो... शाळेत असताना 'आमची पावसाळी सहल' किंवा 'माझा आवडता पावसाळा' असे निबंध लिहून झाले... आज 'पावसात भिजलेली एक मुलगी' या विषयावर एक कविता लिहितोय....
पावसाच्या गोलाकार जल-क्षेपणास्त्रानी
केला अचानक पृथ्वीवर जोरदार हल्ला
बेसावध संध्याकाळ हातपाय होती ताणत
झाला मनुष्यप्राण्यामधे त्वरित गलबला
सगळे पळाले बाजुला आडोशा शोधत
जलधारापासुन स्वताचे अंग सावरत
अन या गदारोळात मी शांत छत्रिधारी
फिरत होतो स्वताची Bag आवरत
ताज्या थेंबानी वाफ़ाळलेल्या चष्म्यातून
नजरेस पडली एक भिजलेली सुंदरी
भर पावसात कानशिले झाली गरम
क्षणात झाली गुड़गुड़ माझ्या उदरी
झटकन काढली bag मधून स्पेशल बाटली
आणि मारला pinku gripe waterचा पेग
office मधल्या कामाने थकलेल्या मेंदू ने
घेतला लगेच राजधानी एक्सप्रेसचा वेग
वाटले तिला भर रस्त्यात गाठून...
ऑफर करावी छत्रीमधुन लिफ्ट
दुख त्या हाताची पर्वा न करता
या कामासाठी करेन तिन्ही शिफ्ट
माझ्या छत्रीची तार जरी तुटलेली
तरी आमच्या हृदयाची तार जुळेल
'मिठी' नदीतल्या पुराच्या आवेशाने
मारलेल्या 'मिठी'तुन तिला प्रेम कळेल
कमळासारख्या गालावरून ओघळणारे
पाण्याचे ते थेंब म्हणजे जणू मोती
जन्मोजन्मीचा मी तहानलेला
क्षणार्धात होतील प्राशन माझ्या ओठी
जणू समुद्रातली जलपरी...अशी ती चाले
रस्त्यावरचा चिखल अल्लडपणे चुकवत
वाटेवरचे सगळे पुरूष जणू ओले बोंबिल
तिच्याकडे बघून भिजलेले अंग सुकवत
पाउस संपला तरी स्वप्नरंजन चालूच
भर रस्त्यात मी वेड्यासारखा तसाच उभा
कावळे-कबूतर जमले माझ्या छत्रीवर
वाटेल तिथे 'शी' करण्याची मिळाली मुभा
तशी ती केव्हाचीच निघून गेली होती
boyfriend च्या bike वर ऐटीत बसून
माझा रुमाल ओलेचिंब भिजला होता...
अहो पावसाने नव्हे........................
.............तोंडाला सुटलेली लाळ पुसून
Jab Main Chhota Bachcha Thaa…
१४ वर्षांपूर्वी
2 comments:
Hmm...Aftr readng sum of ur poems i dont thnk u r a नवशिक्या हौशी anymore...I js hv 1 qt fr u, why arent u makng ths blog as popular as d othr one?
gud 2 read tht u r watching भिजलेल्या मुली. this 1 gud too like earlier posts. u have been turning into mature कवी. keep it up...
टिप्पणी पोस्ट करा