माणूस आशेवर जगतो असे म्हणतात... पण कधी कधी माणूस इतका आशावादी बनतो की प्रत्येक गोष्ट त्या आशेच्या चष्म्यातून एखाद्या खुळ्यासारखा बघत राहतो...हीच आशा मग सीतेसारखी सोनेरी हरिणाचा हटट धरून बसते...आणि असले वेडे हटट पुरवता पुरवता त्या माणसावरच वेडे व्हायची वेळ येते... जगवणारी आशाच जेव्हा जीवनाची शत्रु बनते तेव्हा...
माझी आशा आज एक hopeless case झालीय
आज ती वेड्यांच्या hospital मधे admit होतेय
इच्छेच्या गोठवण्यारया बर्फ गार पाण्यामधे
तासनतास एकटीच पाय टाकुन बसायची
दूर कुठेतरी पेटलेले स्वप्नांचे कंदील बघून
उगीच ती स्वताशीच खळ्खळुन हसायची
वास्तवाचे दगड नियतीने फेकण्याआधी
या वेडीला hospital मधे पाठवलेच पाहिजे
दुखा चे electrick shock देऊन करा बधीर
जणू सुखाचे क्षण तिला कधी आठवलेच नाही जे
निश्चयाच्या तलवारीने केले कलम तिचे शिर
तरी रावणाची दहा तोंडे घेउनी होते परत जिवंत
गुंगीचे रामबाण injection दया तिच्या नाभीत
आता थोड़े तरी जगायला मिळू दया मला निवांत
भ्रमाचे खेळ करुनी ती निर्मिते माया-महाल
की भर दिवस सुद्धा वाटे मला रात्र अंधारी
भावनांचा 3-D चष्मा लावते माझ्या डोळ्यावर
जणू ती धृतराष्ट्र अन् मी कलियुगातली गांधारी
तुम्हाला नाही जमत तर तसे सांगा doctor...
आता मला जिवंत रहायचे असेल तर....
निदान तिला तरी कायमचे संपवलेच पाहिजे...
Jab Main Chhota Bachcha Thaa…
१४ वर्षांपूर्वी
2 comments:
Hmm...The eternal optimist in me wud at once object at the content of ur poem...Bt the fascinated reader n observer in me hs found anthr fantastically worded post...well, i dont knw in wht frame of mind u hv wrttn ths post..bt i simply admired certain sentences and analogies..
like.."हीच आशा मग सीतेसारखी सोनेरी हरिणाचा हटट धरून बसते", "दूर कुठेतरी पेटलेले स्वप्नांचे कंदील बघून उगीच ती स्वताशीच खळ्खळुन हसायची" and many more...d 3-d chashma ws also a good one...i cud go on and on abt ths post...
its surprsng to me too tht despite the content nt agreeing wid my values n opinion on life...it has managed to draw so much compliments frm me..its worth it :D
I agree with Smita... a person would immediately object to the idea behind your poem and enumerate all the reasons why one shouldn't let go off hope.
But having said that, your poem sends out a message that आशा should also be accompanied with clear outlook and practical assessment of reality. Something that is very important for me to keep in mind, considering my placement season is just about to begin in a few months. ;)
All in all, a very thought provoking prose for people whose dreams fly without any rein to stabilize it.
टिप्पणी पोस्ट करा