"मध्यम वर्गीय माणूस नेहमीच भरडला जातो" हे वर्तमानपत्रामधले ठेवणीतले वाक्य... ज्याला life style नाही...जो Social आणि Party Animal नाही... तो सगळ्या मुलींसाठी incompatible असेल का? तो सुद्धा प्रेम करू शकतो... मग एखाद्या मुलीला propose करताना तिला कसे convince करावे लागेल? जर तो realistic असेल, तर त्याला pessimistic म्हणायचे का? की त्याचा mindset एकदम middle-class आहे म्हणुन हिणवायचे ?? ढुंगणावर वास्तवाचे चटके बसले की स्वप्नांच्या मऊ गादीवर सुद्धा आपले बूड टेकवायला भीती वाटते... असाच एक typical middle class माणूस कैफियत मांडतोय...जीवनाची आणि हृदयाची...दोन्ही एकदम.....
प्रेमाच्या वेड्या-वाकड्या सारीपाटावार
अजब नियतीची तिरकी चाल
तू अन् मी म्हणजे दोन सोंगटया
लढावयास फक्त हृदयाची ढाल
राजा-राणीची जागा मिळालीच पाहिजे...
म्हणून अजून एक डाव...फक्त तुझ्यासाठी
अक्राळ-विक्राळ सिमेंटच्या जंगलात
जमिनीत रुतलेले माझे मातीचे पाय
न संपण्यारया गरजांच्या पाठून धावत
एवढ्यातच दमून खाइन मी हाय
सप्तपदीचे फेरे अजून बाकी आहेत
म्हणुन अजुन एक धाव...फक्त तुझ्यासाठी
आयुष्याची किचकट गणिते सोडवताना
महिनाअखेरीचा साधा हिशेब जमलाच नाही
मोठ्या जागेसाठी गेलो कायमचा उपनगरात
पण लोकलच्या प्रवासात जीव रमलाच नाही
हृदयाच्या प्लॉटवर अजुन बरीच जागा शिल्लक आहे
वसवेन प्रेमाचे एक गाव...फक्त तुझ्यासाठी
नावात काय आहे असे काही जण म्हणतात
काही जण नावातले स्पेलिंग सुद्धा बदलतात
नाव चालू रहावे म्हणून काहींची असते धडपड
आमच्या जगण्याला मात्र नाव ठेवून छळतात
लग्नानंतर तुझे आडनाव सुद्धा बदलेल
मध्ये फक्त माझेच नाव...फक्त तुझ्यासाठी
नशिबाने आयुष्यावर केल्या जखमा
तरी अश्वत्थामा बनून भटकत राहीन
'सामान्य'पणाच्या चिखलात रुतलेले चाक
काढता काढता कर्णासारखे मरण पाहीन
दगडासारख्या हातांमध्ये प्रयत्नाची कुर्हाड़
करेन आणखी एक घाव...फक्त तुझ्यासाठी
Jab Main Chhota Bachcha Thaa…
१४ वर्षांपूर्वी
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा