एक राजकीय उमेदवार निवडणुकीच्या रणधुमाळीत लढताना प्रेमाची लढाई सुद्धा त्याच आवेशात जिंकायलानिघतो... प्रेमपत्र लिहिताना election campaigning च्या स्टाइल मध्येच प्रेयसीचे 'एक मत' मागतोय... 'एकमताने' तिच्या हृदयाचा मुख्यमंत्री व्हायला...
"प्रेमाच्या सत्तेत येण्यासाठी
लढवतोय मी ही निवडणूक
प्रत्येक वेळी जप्त झालंय deposit
आता तूच कर माझी सोडवणूक
प्रेमाची निशाणी नीट लक्षात ठेव
प्रिये तुझे मत फक्त मलाच दे...
करतील माझे मित्र बंडखोरी
अन विरोधक प्रखर टीका
होइल आश्वासानांची खैरात
पण घालू नको त्यांना भीका
भर सभेत घालीन तुला दंडवत
प्रिये तुझे मत फक्त मलाच दे...
ना ठोकशाहीचे 'धनुष्य-बाण'
ना 'कमळ' भ्रष्टाचारात बुडालेले
'घड्याळाची' battery स्वदेशीच
ना 'हात' Italy पुढे जोडलेले
मी तर अपक्ष घोडेबाजारातला
प्रिये तुझे मत फक्त मलाच दे...
प्रेमात तुला १००% टक्के 'आरक्षण'
करेन तुझ्या चुकांचे 'कर्ज माफ'
बांधुया स्वप्नांचे 'उद्दाण-पूल'
जरी होईल सरकारची तिजोरी साफ
घोषणा करायला आपल्या बापाचे काय जाते
प्रिये तुझे मत फक्त मलाच दे...."
Jab Main Chhota Bachcha Thaa…
१४ वर्षांपूर्वी
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा