शनिवार, १० जुलै, २०१० |
1 comments
हल्ली मी एकटाच असतो...
रस्ते बदलतात
सोबती बदलतात
आठवणिच्या जखमा
मनात सलतात
मग सोबतीचीसुद्धा भीती वाटू लागते
हल्ली मी एकटाच चालतो...
भूतकाळाच्या चितेवर
आठवणीची प्रेते जाळतो
दूसरा कोणी वारस नसल्याने
मी एकटाच अश्रु ढाळतो
हृदयाचे रुपांतर आता स्मशानात झालेय
हल्ली मी एकटाच जळतो...
दुखामागुन दुःख
जणू आभाळच फाटते
मग जगण्यापेक्षा
मरणे सोपे वाटते
मी जगलो...मी मेलो
कुणालाच फरक पडत नसतो
हल्ली मी एकटाच जगतो...
हल्ली मी एकटाच मरतो...
1 comments:
Kay re!!! evda ekta kaaaa???
टिप्पणी पोस्ट करा