आज भल्या पहाटे ८ वाजता मोरुने
वर्तमानपत्रातला मथळा वाचला
"मराठी माणसाने टोपी घालायला शिकावे"
विचारात पडला साधाभोळा मोरू
टोपी म्हणजे नक्की कुठली??
मोरुला आठवली लगेच
टोपीवाला आणि माकडे यांची गोष्ट
लहानपणात रमलेला मोरू
भानावर आला लगेच
आपली बायको समोर बघताच
आठवला त्याला मित्रांनी सांगितलेला
"टोपी" या शब्दाचा अर्थ आणि
दोन रुपयाच्या त्या वस्तुचे महत्त्व
पण त्याच्या लगेच लक्षात आले
की आपले नुकतेच लग्न झालेय
"वंशाला दिवा हवा" !!
मोरुने केला typical मध्यमवर्गीय विचार
आणि लांबणीवर टाकला
अशा टोपीचा उपयोग
मोरुने विचार केला की
टोपी कापडाची सुद्धा असते
जी डोक्यावर घालायची असते
प्रश्न पडला मोरुला
की मराठी माणसाने नक्की
कुठल्या रंगाची टोपी घालायची??
सफेद रंगाची गांधी टोपी??
अचानक मोरुला ऐकू आला
शिक्षकांनी काढलेला कानाखालचा आवाज
दूसरा गाल पुढे करायच्या भीतीनेच
घाबरून मोरुने विचार बदलला
भगव्या रंगाची टोपी चालेल??
त्याने आपल्या मुठी आवळल्या
ठोकशाहीच्या कल्पनेनेच
आपली किरकोळ प्रकृती आठवून
तो विचारसुद्धा मोरुने सोडला
आता मोरू पुरता भांबावून गेला
अशा अडचणीच्या वेळी
दामूअण्णा हाच असतो
मोरुचा एकुलता एक आधार
दामूअण्णानी लक्ष देऊन ऐकली
मोरुची ही विचित्र कैफियत
दामूअण्णा ध्यानमग्न अवस्थेत
सुक्ष्मात नजर लावून बसले
बराच विचार करून म्हणाले
"कुठली टोपी वापरायची
अन कुणाला टोपी घालायची
हे मराठी माणसाने शिकायला हवे
कारण टोपीचे प्रकार आणि महत्त्व
त्या त्या वेळेवर अवलंबून असते
मोरू... एकच गोष्ट लक्षात ठेव
टोपी सलामत...तो मराठी माणूस पचास !!"
Jab Main Chhota Bachcha Thaa…
१४ वर्षांपूर्वी
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा