पूर्वी तिच्याबरोबर असताना तो
चुकून सुद्धा बारकडे बघायचा नाही
आता तो बार मधून बाहेर पडला की
त्याला रस्त्यामधले काहीच दिसत नाही
माणूस तोच, नजर तीच
बाकी काही फारसे बदलले नाहीय
पूर्वी दोघे एकाच शहाळयातले पाणी
दोन रंगीत नळयांमधून गोडीगुलाबीने प्यायचे
आता पाण्याचा उपयोग "मिक्स" करायला होतो
कारण त्याला अजुन तेवढे "नीट" जमत नाही
पाणी तेच, मिश्रण मात्र वेगळे
बाकी काही फारसे बदलले नाहीय
पूर्वी दोघे चौपाटीवर कळकट भैयाकडून
गरम खारे शेंगदाणे विकत घ्यायचे
आता तो बारमधल्या स्वच्छ वेटरकडून
तेच शेंगदाणे चकणा म्हणून मागवतो
पदार्थ तोच, चवही तीच, उपयोग मात्र निराळा
बाकी काही फारसे बदलले नाहीय
पूर्वी तिच्या शॉपिंगचा खर्च तो
एकट्यानेच मोठया हौसेने करायचा
आता सुद्धा तोच बिल भरतो
त्याने भरपूर ढोसलेल्या दारूचे
बिल भरणारा तोच, खर्च मात्र बराच कमी
बाकी काही फारसे बदलले नाहीय
पूर्वी दोघे भेटल्यावर तासनतास
फक्त तीच बोलत राहायची
हल्ली याला दारु चढल्यावर
एकटाच काहीतरी बरळत राहतो
ऐकणारा तोच, संवाद मात्र वेगळा
बाकी काही फारसे बदलले नाहीय
ती त्याच्या भरलेल्या खिशाबरोबर
त्याचे आयुष्यसुद्धा रिकामी करून गेली
हलका झालेला खिसा फाडून नंतर दारु
उरलेले रिकामे आयुष्य कमी करत राहिली
खिसा तोच, आयुष्य तेच...
आधी ती... नंतर दारु...
बाकी काही फारसे बदललेले नाहीय...
Jab Main Chhota Bachcha Thaa…
१४ वर्षांपूर्वी
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा