तशी तुझी अन माझी मैत्री अघळ पघळ
भूमितीच्या कुठल्याही आकारात न बसणारी
कोन तिचे उलगडावाया जाता अलगद
आपल्याच रेषांमध्ये गुरफटून फसणारी
वरून सहज सोपी वाटे ही नीरगाठ
हृदयाची ही नाजुक गुंतागुंत सुटेना
असले बंध जरी हे रेशमी मुलायम
केला वास्तवाचा प्रहार तरी तुटेना
मैत्री अन प्रेम यांतील बारीक सीमारेषा
झाली अस्पष्ट दोघांच्याही नकळत
व्यापताना मनाचे प्रदेश विनाआक्रमण
राहिल्या जखमा काश्मीरसारख्या चिघळत
मी न विचारलेल्या हजार प्रश्नांची उत्तरे
तुझ्या नजरेतूनच समजली विनासायास
अल्लड दिसणारया मैत्रीत आला होता
पोक्तपणा न शोभणारा आपल्या वयास
झाला होता जणू एक गुप्त करार
आपल्यात बिन शब्दांचा अन कागदाचा
अटींच्या चौकटीमधली घुसमट ही संपेल
जेव्हा हा माझा श्वास थांबेल एकदाचा.........
Jab Main Chhota Bachcha Thaa…
१४ वर्षांपूर्वी
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा