व्यक्तिमत्व होते त्याचे बहुरंगी अन बहुढंगी
मात्र अंतरंगाचे सर्व रंग कधीच पार उडालेले
दवबिंदू अवचित तरळती रंगवलेल्या गालावरी
मिश्किल डोळे भासती जणू धुक्यात बुडालेले
चेहरयावरचे रंग पुसता कोणी ना ओळखे त्याला
होता एक विदूषक असाही....
जगाच्या दृष्टीने जरी असला बालिश अन अपरिपक्व
लाल पिवळ्या टोपीखाली दडले होते असंख्य विचार
मन त्याचे मारी क्षणाक्षणाला अनेक कोलांटउडया
आत दडवलेल्या कारुण्याला विनोदाची भरजरी किनार
सांभाळताना स्वत:ला आयुष्य झाले एक दोरीवरची कसरत
होता एक विदूषक असाही....
आगीच्या रिंगणातून स्वत:ला झोकले असंख्य वेळा
हृदयात मात्र वणव्याने वर्तुळाकार फेर धरलेला
हशा टाळ्या घेउन त्याने लोकांची मने जिंकलेली
पण स्वत:विरुद्धच्या लढाईत तो सपशेल हरलेला
त्याच्या पराभवाचा इतिहाससुद्धा बनली एक विनोदी कहाणी
होता एक विदूषक असाही....
Jab Main Chhota Bachcha Thaa…
१४ वर्षांपूर्वी
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा