मंगळवार, २६ फेब्रुवारी, २०१३ |
0
comments
तसे काल-परवाच भेटलो होतो आपण
पण तुला आणि मला भेटून खरेच एक जमाना झाला …
दुष्काळग्रस्ताची भेट व्हावी मुख्यमंत्र्याशी
तशीच होते तुझी अन माझी भेट
आकाशातली विमाने जमिनीवरूनच बघणारा मी
मग पोहोचतो लगेच चंद्रावरती थेट
कितीही तास भेटलो तरीही… काहीच पुरेसे वाटेना…
पण खरेच… तुला भेटून एक जमाना झाला ……
दुनियेभरच्या गप्पा मारून झाल्यातरी
प्रेमाचे गाऱ्हाणे काही ओठातून निघत नाही
इतकी वर्षे उरात लपवून जीर्ण झालेले
प्रेमाच्या प्रश्नाचे घोंगडे तसेच भिजत राही
हजारदा भेटूनसुद्धा… कोडे काही सुटेना…
आपण दोघे भेटून…. खरेच एक जमाना झाला ……
निरोप घेताना आपल्या नजरेची भेट होई
पुढल्या भेटीच्या आश्वासनाच्या शोधात
माहित असते की लवकरच भेटू आपण…
मग जातात मधले काही दिवस त्याच नादात !!
कितीही भेटलो आपण… तरी भेटण्याची भूक काही मिटेना
आपल्या दोघांना भेटून… खरेच एक जमाना झाला ……

0 comments:
टिप्पणी पोस्ट करा