कुणी प्रेम देता का प्रेम या गरीबाला...
फिरतो गल्लो-गल्ली मी प्रेमाचा भिकारी
हाती घेउनी तुटलेल्या हृदयाचा कटोरा...
मुली फेकती तोंडावर नकाराचे दान
अन् दगड फिरताच मी पाठमोरा...
दिव्या दत्त सुद्धा चालेल, नको मज मधुबाला...
कुणी प्रेम देता का प्रेम या गरीबाला...
कुणी देती मैत्रीची शिळी भाकरी
कुणी बंद करती अपुल्या घराचे दार...
कुणी बनवेल का मला प्रेमाचा माधुकरी
लावुनी 'प्रीती' भोजनाचे वार...
देवाला दोष देऊ की माझ्या नशिबाला...
कुणी प्रेम देता का प्रेम या गरीबाला...
प्रिये..कसे मी सांगू तुला माझे हाल...
'ताई-माई' म्हणुनी कशी मागु भीक
तुला 'प्रिये' म्हणुनच मी साद घालेन...
फाटलेल्या खिशाला ठीगळ लावतानाच
तुझ्याशी प्रेमाचे तीन शब्द बोलेन...
निर्माल्य नको फेकू, घाल गळ्यात वरमाला...
कुणी प्रेम देता का प्रेम या गरीबाला...
जुने-पुराणे कापड आणि तुटलेले चप्पल
माझ्या lifestyle ची पुरती वाट लागलेली...
तुला हवेत रोज pizza-burger महागडे
वडा-पाव खाऊन माझी प्रत्येक रात्र भागलेली...
प्रेमाचे पाणी पाजा वाळवन्टातल्या या अरबाला...
कुणी प्रेम देता का प्रेम या गरीबाला...
ऐन तारुण्याच्या Traffic Signal पाशी
तुझ्या मदमस्त सौंदर्याची गाडी थांबली...
तिथेच उभा होतो भीक मागत इतका वेळ
की तू टाकलेल्या एका कटाक्षाची भाजी सुद्धा आंबली
माझा हा signal चा धंदा, सांगू नको माझ्या 'बा' ला....
कुणी प्रेम देता का प्रेम या गरीबाला...
Jab Main Chhota Bachcha Thaa…
१४ वर्षांपूर्वी
3 comments:
Hey thats a very nice poem... u really captured the plight of 'premacha bhikari' remarkably! ;) Even though the guy's not looking for 'tai-mai che prem', sumthing is better than nothing, isn't it? :P
मित्रा !! ऊर भरून आला ब्लॉग वाचल्यावर !! तू, रस्त्यावरील भिकार्याची तुलना, एका प्रेमासाठी भुकेल्या व्यक्तीशी अगदी अचूक केली आहेस.
मला माहीत नव्हते की तू कविता सुद्धा लिहितोस. ह्या कवितेमुळे तुझ्या व्यक्तीमत्वाचा एक वेगळा पैलू समोर आलेला आहे.
इमेल तू लिहिले आहेस की Title हे Tentative आहे. परंतु हे Title कायमस्वरूपी असण्यास काहीच हरकत नाही. हिंदी मद्धे कविता लिहायची असेल तर 'मां हिंदी' नावाच्या title ने नवीन ब्लॉग सुरू कर..
असेच लिहीत रहा !!
कुणी देती मैत्रीची शिळी भाकरी
कुणी बंद करती अपुल्या घराचे दार...
कुणी बनवेल का मला प्रेमाचा माधुकरी
लावुनी 'प्रीती' भोजनाचे वार...
देवाला दोष देऊ की माझ्या नशिबाला...
कुणी प्रेम देता का प्रेम या गरीबाला...
Jhakaaas man!!!Really enjyd the poem...Esp the above para...
P.S. Read the foll in marathi.. :p
"arey tu maitrila shili bhakri mhanu nako...karan kaahi loka hey pan mhantat ki maitri premacha pahila paool asto" hehe... ;)
टिप्पणी पोस्ट करा