मी प्रेमाची कविता लिहितोय !!
वाचताय ना??
अहो मी प्रेमाची कविता लिहितोय !!
प्रेमात जिंकणारयासाठी
प्रेमात हरणारयासाठी
प्रेमात असणारयासाठी
प्रेमात नसणारयासाठी
प्रेमात फसणारयासाठी
प्रेमात सोसणारयासाठी
सगळयांसाठीच
मी प्रेमाची कविता लिहितोय...
वाचताय ना?
प्रेमात डोळा मारणारी माणसे
पैशावर डोळा ठेवणारी माणसे
सौंदर्यावर भाळणारी माणसे
प्रेयसीला जाळणारी माणसे
झाडामागे पळणारी माणसे
प्रेमिकाना छळणारी माणसे
अगदी प्रत्येकासाठी
मी प्रेमाची कविता लिहितोय !!
वाचताय ना??
जीव देणे, जीव घेणे
हल्ली प्रेमात सगळे काही माफ़ असते
दोन-चार लफडी करूनसुद्धा
प्रत्येकाचे चारित्र्य साफ़ असते
तरीसुद्धा काही माणसांसाठी
प्रेम म्हणजे जगणे असते
आणि जगणे म्हणजे प्रेम असते
अशा माणसांसाठी सुद्धा
मी प्रेमाची कविता लिहितोय !!
वाचताय ना?
Jab Main Chhota Bachcha Thaa…
१४ वर्षांपूर्वी
2 comments:
vachle!!
aawadli.. premachi kavita :)
टिप्पणी पोस्ट करा