अगं तुझ्यापासून लपवावे असे आता
आईशपथ खरेच काही नाही उरले
बरेच काही सांगायचे होते मला
पण मोजके शब्दच आरामात पुरले
गप्पा मारून वाटले होते
सहज तासभर जाईल निघून
गप्प राहून उभा मी तसाच
तो क्षण सुद्धा गेला तिथेच थिजून
डोळ्यांच्या देह्बोलीची सांकेतिक भाषा
ऐकली मी होउन मुकबधीर
डोळ्यांच्या पलीकडले जाणून घ्यायला
झाले होते खुळे मन अधीर
जीभ होती उगीच अडखळत अन
आवाज विचारांच्या ओझ्याने दबलेला
निरोपाचे शब्दच तेवढे स्पष्ट
बाकी संवाद निष्कारण लांबलेला
जाता जाता झालेला ओझरता स्पर्श
माझ्या थरथरत्या बोटांचा तुझ्या हातांना
झाल्या पापण्यांच्या कडा नकळत ओलसर
आपली ही शेवटची भेट संपताना
आपले मार्ग कधीच तसे एक नव्हते
होते ते फक्त एकमेकांना समांतर
नियतीचे दुभाजक काळ्या-पिवळ्या रंगातले
तुझ्यात अन माझ्यात तेवढेच काय ते अंतर....
Jab Main Chhota Bachcha Thaa…
१४ वर्षांपूर्वी
2 comments:
Mitra, college madhlya kavitanchi aathvan karun dilis. Phar bara vatla pan jasta bara vatla asta jar tuzya tondun aiklya astya tar.
But guess what, there is also one member added to the list of Kavitakar ......................................................................... Mr. Rohan Pingle.............................. I don't know whether u believe it or not but its true. Invite him to your blog for some his writing ( I tell you 2 of his 50 Kavitas are good & u should listen to them.)
एक तरी मैत्रीण असावी
बाईकवर मागे बसावी
जुनी हीरो होंडा सुद्धा मग
करिझ्माहून झकास दिसावी !
एक तरी मैत्रीण असावी
चारचौघीत उठून दिसावी
बोलली नाही तरी निदान
समोर बघून गोड हसावी !
एक तरी मैत्रीण असावी
कधीतरी सोबत फिरावी
दोघांना एकत्र पाहून
गल्लीतल्या सगळ्या पोरांची जिरावी !
एक तरी मैत्रीण असावी
जिच्याशी निर्मळ संवाद असावा
कधीतरी छोट्या भांडणाचा
एखादाच अपवाद असावा..
एक तरी मैत्रीण असावी
आयुष्याच्या अनोळखी वळणावर
तुमच्या व्यथा वेदनांवर
तिने घालावी हळूच फुंकर..
एक तरी मैत्रीण असावी
जिच्या मैत्रीत विश्वास रुजावा
तुमचासुद्धा खांदा कधी
तिच्या दुःखाने भिजावा..
एक तरी मैत्रीण असावी
चांदणीसारखी मैत्रीच्या आकाशात
मित्रांचे दिवे मावळले म्हणजे
चालावं पुढे तिच्याच प्रकाशात
टिप्पणी पोस्ट करा