रविवार, १८ जुलै, २०१० |
0
comments
एकटेपणाच्या गर्दीतसुद्धा हरवून जातो मी
हल्ली शोधताना स्वत:चाच पत्ता वरचेवर
पुन्हा एकदा नव्याने "मी" सापडतो मलाच
आयुष्याच्या कुठल्यातरी अनोळखी वळणावर
नवीन जग, नवीन माणसे, नवीन वाटा
रस्त्यावरच्या कोलाहलापेक्षा मनामध्ये गोंधळ
लक्ष्यहीन भटकंती करून घशाला पडते कोरड
नशिबाच्या पाणपोईवर पसरतो हळूच ओंजळ
मागे वळून पाहताना मिट्ट काळोख
समोर उगवलेला प्रसन्न सूर्य खुणावतो
थकलेले हातपाय पुढे ढकलताना
जगण्याचा उत्साह अजुन दुणावतो
जळून बेचिराख झालेल्या आयुष्यात
सगळेच निखारे थंड झाले नसतील बहुधा
फोड आलेल्या हाताने चाचपून बघतोय
अजूनही निखारा धगधगत असेल एखादा.......
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा