रविवार, १९ डिसेंबर, २०१० |
0
comments
आठवणींचे ढग फुटतात
अश्रुंचे बांध तुटतात
आसवांनी गाल भिजतात
अन रडून डोळे सुजतात
जेव्हा तुझी आठवण येते...
आपल्याच हातांनी स्वप्ने पुरली
तरीसुद्धा काही स्वप्ने उरली
जसे काटे हाताला बोचतात
उरलेली स्वप्ने मनाला टोचतात
जेव्हा तू स्वप्नात येते...
कधी कधी सोपी गणिते चुकतात
कधी कधी सोप्या संधी हुकतात
आयुष्याच्या पेपरात शून्य गुण मिळतात
झालेल्या चुका नंतर मला कळतात
जेव्हा तू माझी नसते...
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा